Thursday, July 21, 2016

हलकी मिठी


"हलकी मिठी "
(duet song)




मी  पावसात चिंब चिंब भिजले
हलकेच कुजबूजनी मिठीत आले..
मी  पावसात चिंब चिंब भिजलो
हलकेच कुजबूजनी मिठीत आलो.. .

आता सोड ना रे, कोणी पाहतील ना
 वळचणीचे सारे पाझर वाहतील ना
हसून मी गाली, पुन्हा कशी लाजले...
मी  पावसात चिंब चिंब भिजले
हलकेच कुजबूजनी मिठीत आले..

अडोश्याला असे, नको ना थांबाया
हळवी नाती घाईत, नको ना सांधाया
फेरता तू तोंड, पुन्हा मागे लागले...
मी  पावसात चिंब चिंब भिजले
हलकेच कुजबूजनी मिठीत आले..

आता जरासा झिरमिर पाऊस थांबला
पुन्हा मुहूर्त पुढेपुढे नव्याने लांबला
चुकले ते माझे, पुन्हा असे वागलो .. .
मी  पावसात चिंब चिंब भिजलो
हलकेच कुजबूजनी मिठीत आलो..
मी  पावसात चिंब चिंब भिजले
हलकेच कुजबूजनी मिठीत आले..
.
... मदि. भिलारे
दि. 21'07'2016

No comments: