शब्द
The Words
This poem is close to words ... What is a word? The word is an insult, the word is an honor, the word happiness is sometimes sorrow
![]() |
| Words are the language of expression |
सहजच पहाता कळावे, इतुके अवघड शब्द कधीच नव्हते,,,,
पण अर्थाचा अर्थ कळावा, इतुके सोपेही कधीच नव्हते..
ज्याने त्याने आपापल्या परीघाने लावला अस्तित्वाचा अर्थ..
स्वतःच्या वर्तुळात खेळावेत, त्रिज्येइतुके शब्द कधीच नव्हते..
सोय पाहूनी सोय केली, सोईसाठी सोईने वापरले वरवरचे
तडजोड करणारे, जुळवून घेण्याइतुके शब्द कधीच नव्हते...
फटकळश्या तोंडातून, सातत्याने घेतला सत्याचा उखाणा,
पटकन कटू बाहेर पडावे, अधीर इतुके शब्द कधीच नव्हते..
प्रेम, माया, आदर, क्रोध, तिरस्कार, क्षमा वृक्ष तो भावणेचा,
उगा डोळ्यातून वळचाव्या, कोरडे इतुके शब्द कधीच नव्हते..
.
.... मदि. भिलारे
दि. 12'07'2016

No comments:
Post a Comment