::::: "माझी आजी" ::::::
My grandmother
My grandmother, She was hardworking. She took care of me with honest work. She was suffering from severe mental illness before she died. I will never forget her principles and hard work in life. This is a poem of her memories
प्रत्येकाच्या आयुष्यात लळा लावणारी, घासातला घास काढून भावणारी, माया करणारी एखादी तरी 'आजी' असतेच...
सगळं पुर्ण शब्दांत किंवा भावनेत सुद्धा सांगण कठीण आहे.. पण मी शब्दात मांडण्याचा फुटकळसा प्रयत्न करतोय... सध्या आजीकडे पाहून काय वाटतय ते...!
"माझ्या आजीबद्दल.. "
::::: "माझी आजी" ::::::
ये आज्जे,
तुझ्या जिवंतपणी, तुझं मरण मला खातयं गं
काय सांगू या उपर्यांना, डोळा पाणी जातय गं..
.
जपलं होतस फुलापरी साऱ्यांना, जान त्याची कोणत्या ताऱ्यांना
कष्टाने काडी काडी जमवलीस, ज्याची त्याची नड भागवलीस
दिलदार राजबिंड् तुझ जगणं, प्रत्येक क्षण मन खातयं गं...

सेवा तु केली अपरंपार, तुझ्याच नशिबी हे मारं
तू संकटांना कधी न भ्यालीस, सर्व वेदना प्यालीस
तुझा तो टापटीप पणा, आता हेळसांड सारी होतेयं गं...

तू दमल्यावर सवड तरकटवायची , आता डोळे रात्र भरकटवायची
जिवाची घालमेल माझ्या, घर गोंधळते आकांताने तुझ्या
ये ठेव मांडीवरी डोके, नीज आता, मी थोपटतोयं गं..

अजारी होता कधी, खरडा भाकर खायचीस आधी..
आता तुझा स्मृतीभंश, पाहूनी काळजा होतो दंश
तू आहेस जिवंत, गेल्यावरही काळजात तुझी माया राहतेयं गं..

तू होऊनी जगलीस संत, म्हणूनीया माझ्या आयुष्यात हा वसंत
तुझे हाल पहावेना डोळा, मरण मागता तू, माझ्या पोटी गोळा
तुझं तडफडण पाहून, मनात नुसतं कालवून येतयं गं

दैव सरळ जगवेना, दडून बसलयं मरण ही येईना
तू शिकवलेस धडे, तुझवाचून जगण्यातही तडे..
मी आसवे थांबवूनी, मन आतल्या आत सडतयं गं..

तुझं मरण मला खातयं गं..
.
....... मदि. भिलारे
(सुकलेली पानं)
दि. 10'07'2016

![]() |
| My grandmother |

Other Resources:
My Grandmother Asked Me to Tell You She's Sorry
by Fredrik Backman (Goodreads Author), Henning Koch (Goodreads Author) (Translator)

No comments:
Post a Comment