______( कुशीत )______
Embrace/ Hug
![]() |
| Embrace/ Hug |
तू नसताना, कुस बदलत राहतो
मी जागतो, रात्रीला मात्र झोप येते..
राहतात तुझेच विचार मनात घोळत
बावरा होतो काही नाही कळत..
पुन्हा पुन्हा बदलतो कुशी
आणि मिठीत घेतो उशी..
असं वाटतं पाऊस आणि तू अचानक यावं
तुझ्या सोबत चिंब चिंब भिजावं...
तू काही यायची नाहीस आणि पाऊसही
रात्र सरत नाही एकट्याला आणि दिवसही..
मग मंद आवाजात पावसाची गाणी लावतो
पाऊस आलाय का.. हे बाल्कनीत येऊन पाहतो..
पाऊस काही येत नाही इथे
वाट पाहता पाहता मात्र झोप येते...
पुन्हा असाच दिवस जातो
मी तुझी वाट पाहत राहतो...
.
.. मदि. भिलारे
दि. 20'07'2016
Other Resources
The Embrace blog offers an insight into the political, social and cultural context of life in the Middle East

No comments:
Post a Comment