"नातं"
Relationships
This poem is about the relationship of humanity
![]() |
| This poem is about the relationship of humanity |
नसते काही नात्यांना नाव असे
तरी दुरूनच सावरतो कसे...
सुगंधी हास्य फुले कळीच्या गाली
मधुर गुंजन भोंग्यांची मखमाली
भोंगे फुलांवरी बावरते कसे..
नसते काही नात्यांना नाव असे...
भुले हळवी हळद जखमांत
ओलावले रक्त तिला पडे भ्रांत
सुखवते अलवार घाव जसे....
नसते काही नात्यांना नाव असे...
अपघाती झाले रस्त्यातच कोणी
धावती रमेश रमजान टोनी
जातीचे बंद तोडले सारे जसे.....
नसते काही नात्यांना नाव असे...
.
... .. .. मदि. भिलारे
दि. 17'05'2016
Other Resources:
The human person is a relational being. ... A second aspect is the relationship among human beings and a natural tendency to live in society (sociability). We establish “one-to-one” relationships with others and form bonds with social groups to which we belong.

No comments:
Post a Comment