Thursday, June 30, 2016

............ हे जगणं कशासाठी .........Why I'm live?

............ हे जगणं कशासाठी .........
Why I'm live?



Why do I live ?, How to live naturally .. What is life for happiness? This is the poem that answers these questions.


हे जगणं कशासाठी    Why I'm live?





ते शब्द माझे मुळीच नव्हते .!
पण त्यामधल्या भावना माझ्या होत्या ..
त्या जपण्या साठी का होईना, लिहीत राहीलो... !
.
ते वटवृक्ष लावण्याचा माझा हेतू नव्हता
पण, त्यामधली आपुलकीची सावली पडावी...
त्या साठी का होईना, सुर्यासोबत जळत राहिलो....!
.
तो गरजणारा पाऊस माझा नव्हता ..
पण त्यामधला मायेचा ओलावा मिळावा,
म्हणून का होईना , ढगांबरोबर झुरत राहीलो...!
.
देवळात तो देव माझा नव्हता ..
फक्त त्या बद्दलची श्रद्धा माझी होती ..
म्हणूनच देवळाबाहेर का होईना थांबत राहीलो....!
.
हे विश्वातल जगणं माझ नव्हतं ...
पण जगण्याचा आनंद घेत..
मरणाची वाट पाहत, जगत राहिलो...!
.
.....मनोज भिलारे
( स्मशानातील लक्तरे )
दि. ३१.०८.२०१५ —




Other Resources:

Why I'm live?

We live because there are people who love us, and people we love back. We live because we want to find out things, and learn, and become able to do things that we would like to do. We live because others want us to, and we want them to live along with us. We live because we have hope, and want to see what happens next.

No comments: